मंदिर परिसरातील गार्डनची केली पहाणी:ग्रामस्थांच्यावतीने ना. नितेश राणे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान..
⚡कणकवली ता.०६-: कलमठ गावचे ग्रामदैवत श्री काशीकलेश्वराच्या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी उपस्थित राहून श्री देव कलेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थानच्या मानकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप मेस्त्री आणि मानकरी सुनील नाडकर्णी यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिनेश गोठणकर, स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, नितीन पवार, बाबू नारकर, गुरु वर्देकर, रामदास विखाळे, विजय चिंदरकर, महेश मेस्त्री, बाळा चिंदरकर, अनंत हजारे, शाम वर्धेकर, विनोद कोरगावकर, जयराम चिंदरकर, अभि गुरव, समीर गुरव, बबन गुरव, प्रथमेश धुमाळे, सुनील मेस्त्री, अनिल मेस्त्री आदी उपस्थित होते.
बॉक्स :
गार्डन पूर्णत्वास ; ग्रामस्थांचे मंत्री नितेश राणे यांना मनःपूर्वक धन्यवाद – सरपंच संदीप मेस्त्री
श्री देव कलेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर नाम. नितेश राणे यांनी मंदिर परिसरातील नव्याने साकारलेल्या गार्डनची पहाणी केली. या गार्डनचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण असून, हा दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल मंत्री व सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे श्रेय असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप मेस्त्री यांनी नाम. नितेश राणे यांचे आभार मानले.
