कुसरवे येथील भातशेती नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

⚡मालवण ता.०५-:
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील कुसरवे येथील शेतकरी संजय चव्हाण यांच्या भात शेतीला भेट देऊन अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण वर्षा झाल्टे, तालुका कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर वराडचे सरपंच श्रीमती शलाका रावले,उप कृषी अधिकारी श्री परब, सहाय्यक कृषी अधिकारी, अमृता राणे, उपसरपंच श्री गोपाळ परब, तसेच महसूल,कृषी आणि ग्रामविकास विभागाचे संबंधित क्षेत्रिय अधिकारी, , पोलीस पाटील कुसरवे आणि इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित क्षेत्रिय कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या..

You cannot copy content of this page