भाजप प्रणित एसटी सेवाशक्ती संघटना आगारअध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांची आगार व्यवस्थापकांजवळ मागणी.
⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी आगारातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सात दिवसात मार्गी लावा, अशी मागणी भाजप प्रणित एसटी सेवाशक्ती संघटना सावंतवाडी आगारअध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापकांजवळ निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात आडिवरेकर यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी आगारात मार्ग फलक बोर्डाची अत्यंत कमतरता असुन अस्पष्ट असणारे बोर्ड किंवा बोर्डींग खडूने लिहावे लागत असल्याने प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मार्ग बोर्ड करून घ्यावेत, लांबच्या वस्तीच्या विकाणी डिझेल चोरीची दाट शक्यता आहे, त्यामुळे गाड्यांमधील डिशल टॅंक ला लॉक घालुन मिळावेत, सावंतवाडीतील वेंगुर्ला स्थानकावरसमोर दुचाकी, तिनचाकी व इतर वाहने पार्किंग होत असल्याने गाड्या वळविताना त्याठीकाणी चालक वाहकांना नाहक त्रास होत आहे. तरी त्यावर उपाययोजना करावी. चालक व वाहकांना रजेविषयी त्याच बऱ्याच समस्या येत असुन धार्मिक कार्य व आजारपणात रजा नाकारल्याने त्यांच्या प्रकृतीचर परिणाम होत असल्याने यावर योग्य उपाययोजना व्हावी, बस स्थानक परिसरात मासे विक्री होत असल्याकारणाने त्या ठिकाणी ट्रॅफिक समस्या मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. तसेच सावंतवाडी नगरपालिक बस स्टॉप समोर अवैध गाड्या पार्किंग केल्या जातात त्यामुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधीत नगर पालिका, चोलीस ठाणे यांना कळवून योग्य ती उपाययोजना करावी. सावंतवाडी आगाराची आरोंदा बाजार वस्ती ही बऱ्याच वर्षापासु सुरु आहे. वस्तीसाठी चालक/वाहक हे समोरील दाभोलकर गांच्या घरी राहत असून दाभोलकर हे नवीन घर बांधत असुन त्यांनी यापुढे चालक वाहकांना वस्तीसाठी सोय नाही असे सांगीतले आहे. तरी आरोंदा ग्रामपंचायतला कळवून योग्य ती सोय करावी, सावंतवाडी बस स्थानक हे मुख्य रस्ता व गोवा राज्याच्या जवळ असल्या कारणाने स्थानकावर रात्रीच्यावेळी सुध्दा प्रवाशांची रहदारी असते तरी रात्रवस्तीला सुध्दा आणि एक कंट्रोलर देण्यात यावा यावा, काही गावानी पत्रे देऊन सुद्धा अद्याप अद्यापपर्यंत रस्त्यावरील झाडे झुडपे तोडलेली नाहीत. त्यामुळे आरोंदा, निगुडे, सातोसे, फणसखोल व इतर ग्रामपंचायतींना कळवून वाढलेली झाडे झुडपे तोडण्यात यावीत, मांगेली वस्ती, तेरवण मेढे वसीच्या विकाणी सुद्धा चालक वाहकांना ना योग्य सोय नासल्याने संबंधीत ग्रामपंचायतींना कठवून त्याठीकाणी योग्य ती सोय करण्यात यावी, अल्यूकेशन बाबतीत काही कर्मचाऱ्यांवर यअन्याय होत असुन तो दूर करण्यात यावा. उन्हाळा ऋतू येण्या अगोदर येत असुन गाडीतील नादुरुस्त फॅन दुरुस्त करून मिळावेत. बांदा बस स्थानकावर अवैध वाहतुकीचे पार्किंग घ रहदारीचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालकांसोबत हुज्जतीचे प्रमाण वाढत आहे. स्थानकावर ठेकेदाराने मोठे मोठे पाईप अडचण होईल असे ठेवले आहेत. तरी यावर उपाययोजना करावी. या सर्व प्रश्नांची सोडवणुक करून ७ दिवसान संघटनेला लेखी स्वरूपात उत्तर मिळावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
