रवी जाधव:जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमचं सामाजिक कार्य कोणीही रोखू शकत नाही…
⚡सावंतवाडी ता.०५-:
“रुग्णसेवेपासून कितीही रोखले तरी ती रिकामी जागा अजून ताकदीने काम करून भरून काढणार,” असा ठाम निर्धार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी व्यक्त केला.दरम्यान रुग्णसेवेत कधीच अडथळा येऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, “माझा मोबाईल नंबर न मिळाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांच्याशी संपर्क साधावा. रुग्णसेवा आणि मदत निश्चित मिळेल.”
जाधव पुढे म्हणाले, “या स्थळातील उपरलकर-पाटेकर यांची आमच्यावर असणारी छाया आणि रुग्ण तसेच जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमचं सामाजिक कार्य कोणीही रोखू शकत नाही.”त्यांनी सांगितले की, “’मदतीसाठी संपर्क साधा’ या बॅनरवरील माझा फोटो आणि नंबर फाडून कोणी रिकामी केलेली जागा मी सेवाभावी कार्याने भरून काढेल, हा माझा विश्वास आहे.”
या घटनेनंतर शहरवासीयांनी अनेक फोन करून माझा आत्मविश्वास वाढविला असून, “या विकृतीकडे लक्ष देऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” अशी भावना व्यक्त केली, असे जाधव यांनी सांगितले.
पत्रकार बांधवांनी देखील त्यांना साथ देत, “सत्याचा न्याय लवकरच मिळेल, तुमचे कार्य जनतेच्या हिताचे आहे, त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम सुरू ठेवा,” असा सल्ला दिला.
शेवटी जाधव म्हणाले, “आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी हे आयुष्य समर्पित केले आहे. मागे येण्याचा प्रश्नच नाही. पुढेही आम्ही सेवाभावी काम अधिक जोमाने सुरू ठेवणार आहोत.”
