दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव-आजगावकरवाडी येथील जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पाट येथील श्री रामकृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
कणकवली येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय तर कणकवली जानवली येथील श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.
दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने मळगाव-आजगावकरवाडी गोसावीवाडी येथील दत्त मंदिर येथे या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भजन स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. स्पर्धेत एकूण ९ संघांनी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-प्रथम क्रमांक-श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी (बुवा आशिष सडेकर), द्वितीय क्रमांक-श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली (बुवा योगेश मेस्त्री), तृतीय क्रमांक-श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली (बुवा दुर्गेश मिठबावकर) यांनी मिळविला असून उत्तेजनार्थ क्रमांक सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसूर (बुवा हर्षल मेस्त्री) यांना देण्यात आला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास -७००१/-, द्वितीय क्रमांकास ५००१/, तृतीय क्रमांकास -३००१/- तर उत्तेजनार्थ क्रमांकास १५००/- पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट झांजवादक-मंथन कुंभार (श्री सद्गुरु संगीत भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट तबला-साईप्रसाद नाईक (श्री सद्गुरु संगीत भजन मंडळ पिंगुळी)), उत्कृष्ट पखवाज-प्रणव मेस्त्री (मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरूर), उत्कृष्ट गायक-हर्षल मेस्त्री (श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर), उत्कृष्ट हार्मोनियम-हेमंत तवटे (ब्राहमणदेव प्रासादिक भजन मंडळ), शिस्तबध्द संघ- श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे), उत्कृष्ट कोरस-श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण संगीत अलंकार अजित गोसावी व विवेक सावंत यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी व आजगावकर गोसावीवाडी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
