मळगाव येथे १६ रोजी स्वरचित काव्य वाचन स्पर्धा ..

राधारंग फाउंडेशनच्यावतीने स्व. सौ अनुराधा तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ स्पर्धेचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने स्व. सौ अनुराधा अरूण तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ रविवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“पाऊस” हा स्पर्धेतील कवितेचा विषय सून स्पर्धेत प्रथम क्रमांक १५००/-, द्वितीय क्रमांक १०००/-, तृतीय क्रमांक ७००/- व उत्तेजनार्थ ५००/ व सन्मानचिन्हे अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
राधारंग फाउंडेशन संस्था जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध स्पर्धा, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय मदत, आरोग्य शिबिरे, स्पर्धा परीक्षा असे अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचवी ते नववीच्या मुलांकरिता आहे. स्पर्धकाने स्वरचित कविता सादर करावी. सहभागी विद्यार्थ्यांनी आपली नावे गुरुनाथ नार्वेकर ८८५५०७९३४६, ९४२२३७९३४६, प्रथमेश नाईक-९४२३०५१६८७ व हेमंत खानोलकर-९८८२७१३९३८. यांच्याशी संपर्क साधून नोंदवावीत. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रथम नोंदणी केलेल्या पहिल्या २० स्पर्धकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाईल. एका प्रशालेतून जास्तीत जास्त दोन स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेत नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नाव नोंदवण्यासाठी अंतीम तारीख १४ नोव्हेंबर आहे.

You cannot copy content of this page