सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे आज त्रिपुरारी पौर्णिमा जागरोत्सव…

⚡सावंतवाडी ता.०५-: सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे आज ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा जागरोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यनिमित्त सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सव होणार असून भक्त मंडळींनी किमान ५ पण्त्या, अर्धा लिटर तेल व वाती घेऊन स्वतः पणत्या मंदिर परीसरात प्रज्वलीत कराव्या. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता तुलसी विवाह, रात्री ८. ०० वाजता श्री देव इस्वटी महापुरुष मंडळाचे ढोल पथकाचे वादन, रात्री ९. ०० वाजता भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page