निशांत तोरसकर यांची टीका: सावंतवाडीची जनता ठाकरे शिवसेनेच्या बाजूने राहणार..
⚡सावंतवाडी, ता.०५-: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा “पैशाचा माज” सावंतवाडीकर उतरवतील, असा आरोप ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांनी केला.
ते म्हणाले, “विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करण्यातच सत्ताधाऱ्यांचा भर आहे. शहराचा खराखुरा विकास झालाच नाही. त्यामुळे आता जनतेत प्रचंड नाराजी असून येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून यांना उत्तर दिले जाईल.”
तोरसकर पुढे म्हणाले, “सावंतवाडीकर यावेळी ठाकरे शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील. सत्ताधाऱ्यांचा पैशाचा माज उतरेल आणि आमचे नगराध्यक्ष पदासह २० उमेदवार निश्चितपणे विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच त्यांनी सांगितले की, “आमच्याकडे सक्षम व जनतेच्या विश्वासास पात्र उमेदवार आहेत. आम्ही पक्षाची तयारी पूर्ण केली आहे. वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, मात्र आमच्या पातळीवर आम्ही निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत.” असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
