निशांत तोरसकर यांची माहिती:ठाकरे गटाची शिवसेना सावंतवाडी नगरपरिषदेच्या रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार..
⚡सावंतवाडी, ता.०५-:
आगामी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाची शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, कुठेही मित्रपक्षाला दुखावेल असे कोणतेही पाऊल न उचलता पक्षाची तयारी सुरू असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी दिली.
तोरसकर म्हणाले की, “आम्ही नगराध्यक्षपदासाठी सिमा मठकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे नाव वरिष्ठांकडे विचारार्थ पाठवले आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल आणि आम्हाला हिरवा कंदील मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
