⚡वेंगुर्ले ता.०३-: तालुक्याची
ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला बुधवार 5 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.यनिमित्त
सकाळी ८ वा. श्री देवी सातेरीची पाद्यपूजन,
सकाळी ९ वा. श्री देवी सातेरीच्या पालखीचे आगमन, रात्रौ ११ वा. श्री देव रामेश्वराची पालखी भेट,
तरंगदेवता, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी यांच्या पालखीसह मंदिरास पालखी प्रदक्षिणा होणार असून यावेळी शोभेच्या दारूसामानाची व फटाक्यांची आतषबाजी,
त्यानंतर रात्रौ श्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे .सकाळपासू न मंदिरात केळी ठेवणे, नारळ ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत होणार आहेत. उत्सवानिमित्त, पुष्पपुजा, मंदिरात खास फुलांची आकर्षक सजावट व संपूर्ण मंदिरास “नयनरम्य विद्युत रोषणाई” करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ, श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
वेंगुर्ले ग्रामदेवताश्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 5 नोव्हेंबर रोजी…
