अणसूर येथील सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ द्वितीय:श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थानच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन..
⚡सावंतवाडी ता.०३-: निरवडे कोनापाल येथील जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत वालावल येथील लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
अणसूर येथील सद्गुरु प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर मळगाव येथील समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
निरवडे कोनापाल येथील श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थानच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भजन स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ वालावल (बुवा सुरज लोहार), द्वितीय क्रमांक सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ अणसूर (बुवा हर्षल मेस्त्री), तृतीय क्रमांक समाधी पुरुष प्रासादिक. भजन मंडळ मळगाव (बुवा गौरांग राऊळ) यांनी मिळविला असून उत्तेजनार्थ प्रथम सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली (बुवा दुर्गेश मिठबावकर), उत्तेजनार्थ द्वितीय साई खोडदेश्वर प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी (बुवा गौरव धुरी) यांनी प्राप्त केला.
प्रथम क्रमांकास ७००१, द्वितीय क्रमांकास ५००१, तृतीय क्रमांकास ३००१ रुपये व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकास १५०१ रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट गायक-बुवा अनिकेत भगत (चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी वेंगुर्ले), उत्कृष्ट हार्मोनियम-दुर्गेश मिठबावकर (सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली), उत्कृष्ट पखवाज राहुल पांगम (चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी वेंगुर्ले), उत्कृष्ट तबला- विनोद देऊलकर (समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव), उत्कृष्ट झांज कृष्णा देसाई (गोठण प्रासादिक भजन मंडळ वजराट), उत्कृष्ट कोरस-साई खोडदेश्वर प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट गजर (लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ वालावल) यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण महेंद्र पिंगुळकर व रूपेश पोवार यांनी केले.
