सोनुर्ली जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलचे नेटवर्क ठप्प…

ग्रामस्थांचा संताप:त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला धडक; उपसरपंच भरत गावकर यांचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.०३-: तालुक्यातील सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव तोंडावर असताना गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे पंधरा दिवसापासून नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होत आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून गावात नेटवर्क नसल्याने ऐन जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित यंत्रणे तात्काळ लक्ष घालावा अन्यथा ग्रामस्थासह कार्यालयाला धडक द्यावी लागेल असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे.
प्रति पंढरपूर आणि लोटांगणाची जत्रोत्सव म्हणून ओळख असलेले सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा गुरुवारी 6 नोव्हेबरला वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. राज्यभरातून या जत्रोत्सवाला लाखो भाविक दाखल होतात गोवा तसेच कर्नाटक राज्यातूनही भाविक भक्त पण न चुकता दरवर्षी जत्रोत्सवा दाखल होतात एकूणच भक्तांची मांदियाळी या दिवशी सोनुर्ली मध्ये पाहायला मिळते सध्या युद्धपातळीवर जत्रोत्सवाची तयारी सुरू असताना गावातील बीएसएनएल टॉवरच्या नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून अधून मधून नेटवर्कची समस्या उद्भवत असताना गेल्या दोन दिवसापासून गावात नेटवर्क गायब असल्याने एकमेकांचा संपर्क तुटला आहे याबाबत वेळोवेळी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेची संपर्क साधूनही काहीच तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावातील नेटवर्क तात्काळ सुरळीत करावे अन्यथा हा ग्रामस्थांना घेऊन बीएसएनएलच्या कार्यालयाला धडक द्यावी लागेल असा इशारा उपसरपंच श्री गावकर यांनी दिला आहे वारंवार आपण या संदर्भात अधिकाऱ्यांशी तसेच संबंधित यंत्रणेची संपर्क साधूनही काहीच हालचाली होताना दिसत नाही गावात दाखल होणारे भाविक भक्तगणांना नेटवर्क अभावी प्रचंड गैरसोय उद्भवणार आहे त्यामुळे संबंधित यंत्रणेने त्वरित नेटवर्क सुरळीत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page