अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांची माहिती*
*💫मालवण दि.०९-:* बंदी कालावधी असूनही पर्ससीन नौका समुद्रात मासेमारी करत असून त्यावर कारवाई होत नसल्याबाबत पारंपारिक मच्छीमारांच्यावतीने आंदोलन छेडणाऱ्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी बंदी कालावधीत पर्ससीन नौका मासेमारी करू शकतात का ? याचा मागितलेला खुलासा मत्स्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न दिल्याने दि. १० मे रोजी समुद्रात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र सध्या मालवणसह जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे मालंडकर यांनी हे उपोषण स्थगित केले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला दिले आहे. बंदी कालावधी असूनही पर्ससीन नौका मासेमारी करू शकतात का याचा खुलासा देण्यासाठी मत्स्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मच्छीमारांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य व सुरक्षा यंत्रणेवर ताण आहे. उपोषण करणे हे यंत्रणेवर अधिक भार टाकण्यासारखे आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून उपोषण स्थगित करत असल्याचे मिथुन मालंडकर यांनी म्हटले आहे. मात्र आमच्या मागणी प्रमाणे लेखी माहिती न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण नक्कीच करू असा इशाराही मालंडकर यांनी दिला आहे.