*नगरसेवक अँड परिमल नाईक यांची मागणी*
*💫सावंतवाडी दि.०९-:* लसीचा पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून योग्य ती माहिती नागरिकांना मिळत नसल्याने सर्वच नागरिकांना लस घेण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, रुग्णालयात देखील गर्दी होत असून, वादविवाद देखील होत आहेत. त्याचा परिणाम सबंधित यंत्रणेला होत असून, नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा ताण देखील आरोग्य यंत्रणेवर येत आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी ही कोरोना वाढीस आमंत्रण देणारे आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रात वाढ करण्यात यावी किंवा पूर्वी प्रमाणे खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू करावे अशी मागणी नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केली आहे.