मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात ४५ वयावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसच्या दुसऱ्या बूस्टर डोस साठी कोव्हीशिल्ड लसचे ५०० डोस उपलब्ध झाले असून उद्या १० व ११ मे अशा दोन दिवशी प्रतिदिन २५० डोस देण्यात येणार आहेत. दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना फोन करून दिलेल्या वेळेत लस घेण्यासाठी येण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी सांगितले. ४५ वर्षे वयाच्या ज्या नागरिकांनी लसचा पहिला डोस घेतला आहे व ज्यांच्या दुसऱ्या डोसचा अवधी पूर्ण होत आला आहे अशा नागरिकांना दुसरा डोस देण्याबाबत ग्रामीण रुग्णालयात नियोजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर आदी उपस्थित होते. मालवण ग्रामीण रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसचे ५०० डोस उपलब्ध झाले असून ते फक्त ४५ वयाच्या वरील नागरिकांच्या दुसऱ्या डोस साठी आहेत. ज्यांनी कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांनीच दुसऱ्या डोस साठी यायचे असून कोव्हॅक्सीन लस चे डोस अद्याप प्राप्त झालेले नाहीत. १० व ११ रोजी ही लस देण्यात येणार असून प्रतिदिन २५० डोस देण्यात येणार आहेत. एक दिवसात तीन सत्रात लस देण्यात येणार आहे. दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांची यादी ग्रामीण रुग्णालयाने तयार केली असून त्यांना फोन करून बोलावून येण्याची वेळ सांगितली जाणार आहे. यामुळे गर्दी वरही नियंत्रण ठेवता येईल असे डॉ. बालाजी पाटील यांनी सांगितले.
मालवणात ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या लससाठी ५०० डोस उपलब्ध…
