सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.१७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा ओरोस क्रीडासंकुल येथे गुरुवार
दि. १६ .१०.२०२५ रोजी संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत संदिप गवस याने तिसरा क्रमांक मिळवून विभागस्तरावर धडक मारली .
कु . वसंत गवस विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कु . वसंत याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा तसेच त्याच्या पालकांनीही मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . वसंत गवस याचे अभिनंदन केले व सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page