ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ’ वरवडेची नवी कार्यकारिणी जाहीर…

संघटनात्मक बळकटीसह नव्या कार्यकारिणीची निवड..

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावातील ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वसंमतीने करण्यात आली असून, या कार्यकारिणीमुळे गावातील कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे.

या नव्या कार्यकारिणीत संतोष प्रकाश पुजारे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर निलेश विष्णू साळवे उपाध्यक्ष, निलेश चंद्रकांत सावंत सचिव, आणि विनायक सुरेश घाडीगांवकर खजिनदार म्हणून निवडले गेले आहेत.

तसेच चेतन विचिवा सावंत सहसचिव, अभिनंदन सुरेश साळवे सहखजिनदार, अनिल अशोक घाडीगांवकर प्रचारप्रसार प्रमुख आणि सुमंगल सुरेश सावंत विशेष सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून निलिंद्र सिताराम आरासकर, सिद्धार्थ प्रकाश फनाईस, रूपेश वसंत वायंगणकर, स्वातिल सुरेश पवळ, संतोष राजाराम पवळ, मनीषा बाळकृष्ण बरवडकर आणि विवेक रमेश राणे यांचा समावेश आहे.

संस्थेच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून वरवडे गावात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून युवा पिढीला प्रेरणा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page