⚡वेंगुर्ला ता.१५-: पुणे येथे झालेल्या याज्ञिक परीक्षेसाठी मालवण-वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यात स्मार्त प्रवेश परीक्षेत कुशल दामले (वेंगुर्ला) व वेदांत गोगटे (वेतोरे) यांनी द्वितीय श्रेणी, संपूर्ण अभिज्ञ परीक्षे आर्य जोशी (दाभोली), विश्वेश कोवाडकर (बेळगांव), श्रेयस कांदोळकर (मडिकेरी) व वरद आठवले (अलिबाग) यांनी प्रथम श्रेणी, शादुर्ल रामतीर्थकर (नृसिहवाडी) याने द्वितीय श्रेणी, साहिल गांगल (पनवेल) याने तृतीय श्रेणी प्राप्त केली. तसेच संपूर्ण कोविद परीक्षेत गोविद दामले (वेंगुर्ला) व ओम जोशी (सोलापूर) यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना वेदमूर्ती याज्ञिक चुडामणी नंदकिशोर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. ही परीक्षा पुणे येथील सहस्त्रबुद्धे महाराज मंदिर व वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे घेण्यात आली.
याज्ञिक परीक्षेत वायंगणी गुरूकूलचे घवघवीत यश…
