निगुडे येथे घरावर विज कोसळून विद्युत मीटर जळून खाक…

⚡बांदा ता.११-: निगुडे गावठणवाडी येथील रवींद्र शशिकांत गावडे यांच्या घरावर आज संध्याकाळी ०४:३० च्या दरम्यान विज कोसळून विद्युत मीटर सह घरातील सर्व विद्युत बोर्ड जळून खाक झाले .घरा बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.विजेचा धक्का एवढा तीव्र होता की घरातील भिंतीलाही तडे गेले सदर घटना येथील श्री संदेश गावडे यांनी आपले चुलत बंधू कुडाळ येथील श्री रवींद्र गावडे यांना कळवल्यानंतर ते घरी आले असता संपूर्ण विद्युत यंत्रणा खाक झाली होती सदर घटनास्थळी निगुडे वायरमन श्री गुरुनाथ कुडव, निगुडे माजी सरपंच समीर गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी धाव घेत पाहणी केली तसेच विद्युत कनिष्ठ अभियंता श्री ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यात आली व सदर विद्युत मीटर आहे त्याचा पंचनामा झाल्यानंतर विद्युत मीटर नवीन देण्यात येणार असे श्री. ठाकूर यांनी सांगितले तसेच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे यासंदर्भात महसूल यंत्रणा व कृषी विभाग यांनी पंचनामे करावे अशी मागणी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली आहे

You cannot copy content of this page