मनीष दळवी:सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार असून, उमेदवारांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे हे यामागील उद्दिष्ट..
⚡सिंधुदुर्ग दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत भरती प्रक्रियेसाठी नोंदणीकृत उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर पुढील आठवड्यापासून सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार असून, उमेदवारांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे हे यामागील उद्दिष्ट असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी दिली.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी आपले नाव नोंदवण्यासाठी बँकेकडून विशेष गूगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शकपणे पार पडणार असल्याने कोणत्याही अफवांना बळी न पडता उमेदवारांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होऊन मेरिट यादीत स्थान मिळवावे, असे आवाहन श्री. दळवी यांनी केले आहे.
