‘कुडाळेश्वर’च्या भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात…

कुडाळ ता.०४-: सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ॲड.अभय देसाई स्मृती ५० व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या अंतीम फेरीला शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुरुवात झाली.
मे. लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे ओंकार देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत मे. लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राहुल उर्फ पपू पाटणकर यानी दिपप्रज्वलन करून उदघाटन केले. मुंबई येथील पंडीत माऊली सावंत आणि श्रीधर भोसले हे दोघे या अंतीम स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहाणार आहेत.
अंतीम फेरीसाठी पहील्या दिवशी शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी, चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी, रामकृष्णहरी भजन सेवा संघ, पाट पंचक्रोशी, सदगुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसूर पाल यांनी भजने सादर केली.
शनिवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वरब्रम्ह प्रासादिक भजन मंडळ, जामसांडे देवगड, श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, घोटगे, श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, भोगवे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी. रविवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली, रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त, दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी यांची भजने होतील.
उदघाटन सोहळ्यात मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर यांचे सोबत नारायण राऊळ, विलासदादा कुडाळकर यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेश कुडाळकर यांनी केले. अंतिम फेरीतील भजने ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भजन श्रोते उपस्थित होते.

You cannot copy content of this page