घाणीच्या साम्राज्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची ग्रामपंचायतची तात्काळ दखल:जावेद खतीब यांचा पुढाकार..
⚡बांदा ता.०४-:
बांदा मोर्येवाडा परिसरातील घाणीच्या साम्राज्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेतली आहे. ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी स्वतः पुढाकार घेत कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करण्यात सहकार्य केले. तसेच संबंधित ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात आली असून ग्रामस्थांनी आपला कचरा या कुंडीत टाकून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या या तत्पर कार्यवाहीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
