३ मृतदेह मिळाले असून अजूनही ४ चार जण बेपत्ता:एका मुलीला वाचवण्यात यश..
⚡वेंगुर्ला ता.०३-:
शिरोडा -वेळागर समुद्र किनारी कुडाळ व बेळगांव येथील पर्यटनासाठी आलेल्या दोन कुटुंबातील ८ व्यक्ती आज सायंकाळच्या सुमारास बुडाल्याची दुर्देवी घटना घडली.४ व्यक्तींचे मृतदेह सापडले असून एका मुलीला वाचवण्यात यश मिळाले मात्र अजूनही चार जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
बेळगाव येथील मनियार व कित्तूर तसेच गुडीपुर, कुडाळ येथील असे दोन कुटुंब पर्यटनासाठी वेळाघर या ठिकाणी आले होते. सदर परिवारातील ८ व्यक्ती समुद्रात पाण्यात हाताची साखळी करून खेळत असताना. सुमारे सायंकाळी ५:४५ दरम्यान अचानक मोठी लाट येऊन ७ जणांना पाण्यात खेचून गेली. यामधील तीन इसमांचे मयत झाले असून त्यांचे मृतदेह सापडले असून चार जण अजूनही बेपत्ता आहेत तर इम्रान कित्तूर वय १७ वर्षे या मुलीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेत फरीन इरफान कित्तूर वय ३४ वर्षे (f),इबाद इरफान कित्तूर वय १३ वर्षे राहणार लोंढा, बेळगाव. (M) आणि नमीरा आफताब अखतार वय १६ (f) वर्षे, राहणार, लोढा, जिल्हा बेळगाव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तर इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय ३६ वर्षे (m),इकवान इमरान कित्तूर वय १५ वर्षे (m)दोन्ही राहणार, लोंढा बेळगाव,फराहान महम्मद मणियार वय २५ वर्षे (m),गुडीपूर, कुडाळ, व जाकीर निसार मणियार वय १३ वर्षे (m) राहणार, गुडीपूर, कुडाळ हे चार जण समुद्रात नापत्ता असून सायंकाळी उशिरा अंधार पडेपर्यत स्थानिकांच्या मदतीने स्थानिक बोटिं च्या साहाय्याने शोध घेतला असता ते अद्याप मिळून आलेले नाहीत. समुद्र खवळलेला असल्याने शोध कार्यात व्यत्यय येत असून आज सायंकाळी अंधार पडल्यावर शोध मोहीम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोधू मोहीम चालू करण्यात येणार असून मयत व्यक्तीबाबत अकस्मात मृत्यू दाखल करून पुढील कारवाई चालू असल्याचे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी माहिती दिली. मात्र घडलेल्या या अकल्पित घटनेने वेंगुर्ला तालुका हादरला आहे.
