सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले:आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी केली व्यक्त..
⚡बांदा ता.०४-:
बांदा मोर्येवाडा परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिस्थितीमुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात ग्रामस्थ संदीप नार्वेकर यांनी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून नियमितपणे कचरा व्यवस्थापन व्हावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
