किल्ले वाळूशिल्प स्पर्धेत माध्यमिक गटात देवबागच्या डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल प्रथम…

⚡मालवण ता.०३-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने आयोजित किल्ले वाळूशिल्प स्पर्धेत माध्यमिक शाळा गटात अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत प्रथम क्रमांक पटकाविला.

मालवणच्या चिवला बीच येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हायस्कूल गट इयत्ता आठवी ते दहावी मध्ये डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग प्रशालेचे इयत्ता ९ वी मधील मयुरेश काशिनाथ चोडणेकर, समर्थ तुकाराम तांडेल तसेच इयत्ता १० वी मधील हितेश ज्ञानेश्वर तुळसकर, पियुष संदीप आचरेकर हे चार विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्याच्या वाळूशिल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या चारही कलावंत विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक वसंत मेस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि सदस्य तसेच पालक आणि ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. मेस्त्री यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page