प्लास्टकवर नियंत्रण आणा, वन्यजीवांचे रक्षण करा…

उपवनसंरक्षक शर्मा:धामापूर येथे वन्यजीव सप्ताहा निमित्त स्वच्छता आणि वृक्ष लागवड मोहीम संपन्न…

⚡मालवण ता.०३-:
वन्यजीव सप्ताह च्या निमित्त वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र धामापुर मधील धामापुर तलाव येथे स्वछता मोहिम व वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी सहा.वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड, सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि.सचिन शिरतुडे, कुडाळ रेंज चे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, ग्रामपंचायत धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, सम्यंतक संस्थेचे सभासद प्रथमेश काळसेकर, कौशलं जोशी, रोहित आजगावकर, मोहम्मद शेख यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपवनसंरक्षक सावंतवाडी आयएफएस मिलिश शर्मा यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले. वनक्षेत्रात प्लास्टिक आदि कचरा टाकू नये. वन्यजीव पर्यावरणीय अन्नसाखळीचे महत्वाचे घटक असून त्यांचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ग्रामस्थांच्या सहभागातुन धामापूर तलाव लगत वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवांस घातक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे उपवनसंरक्षक सावंतवाडी, आयएफएस मिलिश शर्मा व सरपंच धामापूर यांचे हस्ते वनक्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली.

You cannot copy content of this page