⚡मालवण ता.०३-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘किल्ले वाळू शिल्प स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या किल्ले वाळूशिल्प स्पर्धेतील ११ वी ते १२ वी या कनिष्ठ महाविद्यालयीन गटात भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री, मयुरेश दिलीप वायंगणकर, तन्मय जाधव व अनिमेश कांदळगावकर यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ‘दुर्गराज’ म्हणजेच रायगड किल्ल्याची प्रतिकृती वाळूद्वारे साकारली. या कलाकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत व अन्य पदाधिकारी तसेच भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हणमंत तिवले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
