⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत याची बिनविरोध निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रणय व कौस्तुभ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, विभाग प्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, दादा नाईक, सूरज बिरमोळे, किरण अहिर यांसह हर्ष धामापूरकर, मोहन गावडे, शशांक नाबर, प्रताप लोंढे, पार्थ सापळे, अनिश देऊलकर, अंकुश राऊळ, निखिल पिकूळकर, आदित्य राऊळ, आदित्य चव्हाण, प्रथमेश पवार, आर्यन राणे व अन्य उपस्थित होते.
