मालवण तालुका पत्रकार समिती आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेश चतुर्थी उत्सव निमित्ताने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल स्पर्धा प्रमुख अमित खोत व समीर म्हाडगुत यांनी जाहीर केला आहे. स्पर्धेत नितीन गावडे प्रथम क्रमांक, भूषण मेतर द्वितीय क्रमांक, प्रफुल्ल देसाई तृतीय क्रमांक यांसह उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक भाऊ भोगले, द्वितीय क्रमांक मनोज चव्हाण, तृतीय क्रमांक अर्जुन बापार्डेकर हे विजेते ठरले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत तालुकास्तरीय घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी ही स्पर्धा मर्यादित होती. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारणी सदस्य अमित खोत यांच्याकडे स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. स्पर्धेला पत्रकार समिती सदस्य यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धा प्रमुख अमित खोत, निवड समिती सदस्य समीर म्हाडगुत यांनी पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, उपाध्यक्ष परेश सावंत, खजिनदार संदीप बोडवे, सदस्य आप्पा मालंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह मालवण येथे पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीत स्पर्धा निकाल जाहीर केला. स्पर्धेतील विजेत्याना आकर्षक बक्षीसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तर सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष सन्मानित केले जाणार आहे. लवकरच मालवण पत्रकार समितीचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी पारितोषिक वितरण व अन्य सन्मान सुपूर्द केले जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page