खनिकर्म मधून रेडी गावातील नुकसानी द्यावी

भारतीय भ्रष्टाचार संस्थेच्या रेडकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी;१२८३ नारळ झाडे व शेत जमीन नापीक बनली आहे

*💫वेंगुर्ले दि.०८-:* मायनिंग कंपनीने रेडी गावातील काही वाड्यांमध्ये ठरल्या प्रमाणे पुरेसे पाणी पुरवठा न केल्यामुळे सुमारे १२८३ नारळाची झाडे पाण्याअभावी सुकून शेतकऱ्यांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील काही शेत जमिनीमध्ये वारंवार टाकावू माती, चिखलाचे पाणी सोडून त्या जमिनी कायमस्वरूपी नापीक केल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे जनहितार्थ १२ रुग्णवाहिका खनिकर्म निधी मधून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना देखील खनिकर्म निधी मधून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे भारतीय भ्रष्टचार निवारण संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दाजी नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रिमा मेस्त्री, पदाधिकारी कृष्णा मराठे, जगन्नाथ राणे, मुरलीधर राऊळ, पृथ्वीराज राणे, रविंद्र राणे, महादेव मराठे, राजेश सातोसकर, सौरभ नागोळकर, सिद्धेश शेलटे, प्रविण भगत, राजाराम चिपकर, बाळा जाधव, विनय मेस्त्री, अरुण कांबळी, दिलीप साळगावकर व इतर सदस्य व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page