झाराप फाटा येथील अपघात विद्यार्थी ठार…

दोन विद्यार्थी जखमी:संतप्त नागरिकांचा रास्ता रोको..

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता झाला. त्यानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

You cannot copy content of this page