आंबडोस गावचा पारंपारिक दसरा उद्या…

⚡ओरोस ता २९-: मालवण तालुक्यातील आंबडोस गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ यांचा खंडे नवमीचा दसरा बुधवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मानकरी मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

     आंबडोस गावचा पारंपारिक दसरोत्सव खंडे नवमी दिवशी सुरू होत आहे. या दिवशी मुख्य दसरा होणार आहे. दुपारी ३ वाजता दसरा उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यावेळी शिव लग्न, कुवाळा बळी आणि सोने लुटणे आदी विधी पार पडणार आहेत. तर विजया दशमी दिवशी २ ऑक्टोबर रोजी श्री देव रवळनाथ चरणी येणाऱ्या भाविकांचे गाऱ्हाणे वारेसुत्राच्या  कानी घातले जाणार आहे. या शिवाय दसरोत्सव निमित्त सुरू असलेल्या ग्रंथ वाचनाचा समारोप ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानिमित्त महा प्रसादाचे दुपारी आयोजन करण्यात आले आहे. दसरा उत्सव आणि महाप्रसाद याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो:- श्री देव रवळनाथ

You cannot copy content of this page