सिंधुदुर्गात ऑक्सिजनचे नवीन प्लांट स्थापन करण्यास तातडीने मंजुरी द्यावी – खास. सुरेश प्रभू…

*💫मालवण दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचे नवीन प्लांट स्थापन करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली असून जिल्ह्यातील कोरोना स्थिती व ऑक्सिजन कमतरतेबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचेही खास. प्रभू यांनी लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढून मृत्यूही वाढल्याने माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी चिंता व्यक्त केली असून जिल्ह्यातील कोरोना संकटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमण परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. जिल्ह्यात खासगी रिफिलर नाहीत. ऑक्सिजनसाठी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. सिलेंडर भरण्यासाठी कोल्हापूरला जावे लागते. त्यामध्ये सिलेंडर भरण्यासाठी वाट पाहणे, जाणे – येणे यात १२ तासांचा वेळ जातो. जिल्ह्यात दोन पीएसए प्लांट आहेत. पण सध्याच्या ऑक्सिजनची मागणी त्यापेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन १०० एलपीएम क्षमता उपयुक्त ठरू शकते. कोकणच्या जनतेला वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. प्राणवायू पुरवठा सातत्याने होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे नवीन प्लांट लगेच स्थापन करण्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी विनंती खास. प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

You cannot copy content of this page