बांदा येथील साई मठात श्री साई सतचरीत्र चक्रीपारायण भक्तीमय वातावरणात संपन्न…

⚡बांदा ता.२८-: साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित बांदा येथील श्री साई मठात सालाबादप्रमाणे यंदाही साईपुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी श्री साई सतचरीत्राचे चक्रीपारायण भक्तीभावाने पार पडले.

पहाटे ६.०० वाजता पारायणाला प्रारंभ झाला. सतत पठण व भक्तिगायनाने वातावरण भारावून गेले. सकाळी १०.०० वाजता पारायणाची सांगता करून श्री साईची महाआरती करण्यात आली.

या सेवेत १८ साईभक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये राकेश केसरकर, सौ. राजश्री तेंडले, सौ. वर्षा केसरकर, भाऊ वाळके, सतीश नाटेकर, सौ. दर्शना केसरकर, सौ. सुकन्या नाटेकर, सौ. पूजा विर्नोडकर, शलाका येडवे, भरत शिरोडकर, मनोज कल्याणकर, सौ. स्मिता पेडणेकर, सौ. स्नेहलता शिरोडकर, सौ. स्वाती विर्नोडकर, मंगलदास साळगांवकर, सौ. अर्चना सावंत, बंड्या हरमलकर आणि निखिल मयेकर यांचा समावेश होता.

श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने सर्व भक्तगणांच्या सुख-समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी साईचरणी प्रार्थना करण्यात आली. भक्तीमय वातावरणात पारायणाची सांगता झाली.

You cannot copy content of this page