संजू परब यांच्याकडून स्वागत: आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेत जोरदार इनकमिंग..
⚡सावंतवाडी ता.२८-: आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाले असतानाच आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आरोंदा येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी परब यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत यापुढे गावात शिवसेनेच्या माध्यमातून जो काही सहकार्य लागेल तो आपण निश्चितच तुम्हाला करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
यावेळी देवानंद खवणेकर, गजानन कुबल, जगन्नाथ मोटे, कार्तिक नाईक, विठोबा ताटकर,साईराज नाईक, आदींनी आज शिंदे शिवसेना प्रवेश केला.
