मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत…

अन्यथा तीव्र आंदोलन करू :महेंद्र म्हाडगुत व ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा..

⚡मालवण ता.२५-:
मालवण शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कचेरी ते भरड ते देऊळवाडा या रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी नित्कृष्ट पद्धतीने बुजविले गेल्याने या खड्ड्यांमधील सिमेंट उखडून खड्डे जैसे थे बनले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे अन्यथा याच खड्डेमय रस्त्यावर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण शहर प्रवक्ता महेंद्र म्हाडगुत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्यांची ठाकरे शिवसेनेचे मालवण शहर प्रवक्ता महेंद्र म्हाडगुत व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन रस्त्यांवरील खड्ड्याच्या समस्येबाबत निवेदन दिले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश चव्हाण, सचिन गिरकर व इतर उपस्थित होते.

शांतता बैठकीत ठरल्याप्रमाणे गणेश गणेशचतुर्थी पूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईगडबडीत नित्कृष्ट सिमेंटने खडे बुजविले गेले. त्याबाबत ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबी जोगी व कार्यकत्यानी आक्षेप घेतला होता. आजमितीस त्या रस्त्याच्या खड्यातील सिमेंट उखडून फक्त धुळ व खडी शिल्लक राहीली आहे. भरड ते फोवकांडा पिपळ हा रस्ता शाळा, कॉलेज व बाजार असल्याने रहदारीचा रस्ता आहे. हरीहरेश्वर मंदीर ते लिमये हॉस्पिटल हा रस्ता तर खड्ड्यामुळे मृत्युचा सापळा बनला आहे. तर रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून घसरून बरेच जण पडलेले आहेत. सदरील रस्त्यावरून चालताना विद्यार्थी, नागरिक तसेच दुचाकीस्वार यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील खड्डे भरणे आवश्यक असून तातडीने हा रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी सदरील रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा. याबाबत कार्यवाही नझाल्यास याच खड्डेमय रस्त्यावर तीव्र आंदोलन उभारले जाईल यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page