ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून स्वच्छता मशाल फेरी चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२५-: ग्रामपंचायत मुळेवाड कुंडुरेकडून पंचायतराज अभियान अंतर्गत स्वच्छता मशाल पेरी काढून जनजागृती करण्यात आली.
सध्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्व गावागावातून राबवले जात आहे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये हे अभियान मोठ्या जोमाने आणि उत्साहाने राबवले जात आहे यालाच अनुसरून मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थ, बचत गट महिला,त्याचप्रमाणे गावातील विद्यार्थी,शिक्षक, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून ग्रामपंचायत कडून स्वच्छता मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी स्वच्छ गाव सुंदर गाव, घरापासून सुरुवात करा स्वच्छ भारत घडवा अशा घोषणा देऊन मुळेवाड शाळा नंबर एक ते मळेवाडी जकात नगर चौक अशी फेरी काढून स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक,मुख्याध्यापक वेंगुर्लेकर, शिक्षक बांबुळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page