⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच श्री.अक्षय पार्सेकर आणि युवा गृप न्हावेली यांच्या संकल्पनेतून दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर न्हावेली येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामस्तरीय आकाश कंदील स्पर्धा तसेच सावंतवाडी तालुकास्तरीय नरकासुर स्पर्धा यांचा समावेश असून, या स्पर्धा रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ईस्वटी मंदिर न्हावेली – पार्सेकरवाडी येथे होणार आहेत.
स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आकाश कंदील स्पर्धेत प्रथम पारितोषिक २,००० रुपये, द्वितीय पारितोषिक १,५०० रुपये व तृतीय पारितोषिक १,००० रुपये अशी बक्षिसे जाहीर केली आहेत. नरकासुर स्पर्धेत अनुक्रमे ३,००० रुपये, २,००० रुपये व १,००० रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत.
या स्पर्धांसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. आकाश कंदील स्पर्धेत सहभागीदारांनी स्वनिर्मित वस्तूंचा वापर करून कंदील तयार करणे बंधनकारक आहे. नरकासुर स्पर्धा केवळ सावंतवाडी तालुक्यातील स्पर्धकांसाठी खुली ठेवण्यात आली असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
आयोजकांच्या वतीने ग्रामस्थांनी या स्पर्धांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपावली सणाचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
अक्षय पार्सेकर – ९४२२९४०३४८
समीर पार्सेकर – ९९२११०९४९३
राज धवन – ८३६९००६७८४
ओम पार्सेकर – ७५०७३०२१५८
