तारकर्लीत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫मालवण, दि.०७-:* जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम आहे. त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज तारकर्लीत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. गोवेकर व शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हस्ते रक्तदानासाठी अथक परिश्रम घेणार्‍या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील कोविड ग्राम समितीने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी केले. या रक्तदान शिबिरात विशेष म्हणजे महिला वर्गाच्या वतीने दर्शना कुंटे हिने रक्तदान करून महिला वर्गामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी तारकर्ली शाखाप्रमुख आबा केळुसकर, संदीप भोखर, राजू मेस्री, प्रभाकर राकम, श्री. मोंडकर, भीवा कोळंबकर, रमेश कद्रेकर, मुकुंद मयेकर, सतीश टिकम, रोहन तावडे, वैभव सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page