⚡देवगड ता.२१-:
तालुक्यातील प्रसिद्ध इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामते येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत कीर्तन, भजने, गायकांचा विशेष कार्यक्रम तसेच पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहेत.
कीर्तन मालिकेत अशोक हिंदळेकर, श्वेता मेस्त्री,स्नेहलदिप सावंत, किरण पारकर, गोविंद आसोलकर, कमलाकर पाटकर ,अमित सावंत आदी नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत.
गायकांच्या विशेष कार्यक्रमांत मनोज मेस्त्री, पं. मुकुंद क्षीरसागर, पं. अजीत गोसावी, पं. श्रेया देवधर यांचे सूरमयी गायन रसिकांना लाभणार आहे.
धार्मिक विधींमध्ये २२ सप्टेंबरला घटस्थापना, २६ सप्टेंबरला ललिता पंचमी, ३० सप्टेंबरला श्रींच्या पंचारती ताटाची पूजा तसेच १ ऑक्टोबरला होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन आहे. दरम्यान २ ऑक्टो. चारही शिव कळ्यांसोबत संस्थानिक थाटाचा सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.
भजने आणि विशेष कार्यक्रमांमध्ये 22 सप्टेंबर रोजी बुवा संदीप लोके , 23 सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ महिला भजन मंडळ मिठबाव, 24 सप्टेंबर रोजी महेश पांचाळ 25 सप्टेंबर रोजी राजू मुंडे 26 सप्टेंबर रोजी संतोष शिरसेकर, 28 सप्टेंबर रोजी समय नृत्य खुडी यांचा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी स्वप्निल पांचाळ , 30 सप्टेंबर रोजी श्रीधर मुणगेकर यांचे भजन होणार आहे
दररोज सकाळ-संध्याकाळ पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 6 ते 7 वाजता श्रींची महापूजा, सकाळी 10 ते 12 गायनाची बैठक ,दुपारी 12 वाजता सनई चौघडा, सायंकाळी 4 ते 5 सनई वादन, सायंकाळी 5 ते 7 गायनाची बैठक सायंकाळी 7 ते 9 सुस्राव्य भजन ,9 ते 9.30 वा. पुराण वाचन ,9.30 ते 11.30आरती पालखी प्रदक्षिणा सनई वादन, रात्री 11 ते 12 किर्तन , रात्री 12 वा. श्रींच्या संचार यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून , याशिवाय कमलाकर पाटकर दरबारी गायक महेंद्र मेस्त्री ,मंगेश पाटकर ,गुरुनाथ पाटील, अनिल हडप, तेजस पाटकर यांसारखे अनेक नामवंत स्थानिक कलाकार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . तरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.
