रोणापाल येथील दयासागर छात्रालयाला भाजपकडून धान्य वाटप…

अजय सावंत यांचा पुढाकार: रवींद्र चव्हाणंच्या वाढदिवसानिमित्त भेट..

⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय सावंत यांनी रोणापाल येथील ‘दयासागर छत्रालय’ या संस्थेला भाजपच्या माध्यमातून धान्य वाटप केले.

यावेळी बंटी जामदार, सबिस्टन फर्नांडिस, चंद्रकांत धर्णे, मिसबा शेख, सुकन्या टोपले, संस्थेच्या वतीने मंगल कामत, जीवबा विर उपस्थित होते.

यावेळी अजय सावंत म्हणाले ‘दयासागर छात्रालया’ चे कौतुक केले. अखिल भारतीय सेवा अभियान संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या या छत्रालयात मुलांना योग्य संस्कार मिळवून त्यांचे शिक्षण चांगले होत आहे, असं ते म्हणाले. भविष्यात या संस्थेला आपल्याकडून व भाजप यांच्याकडून कायम सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

You cannot copy content of this page