पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य:शहर भाजप आणि विशाल परब यांचा उपक्रम..
⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहर भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांना तात्काळ व मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आज अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फिरता दवाखान्याचा शुभारंभ येथील भाजप कार्यालय येथे भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचे हस्ते फित कापून करण्यात आला.
यात 100 पेक्षा जास्त तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आपण भाजप तर्फे करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व विशाल परब यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, अँड. परिमल नाईक, मनोज नाईक, राजू बेग, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, प्रसाद अरविंदकर, संजू शिरोडकर, वैशाख मिशाल, नागेश जगताप, सविता टोपले, मेघना साळगावकर, गौरी मुद्राळे, आदी यावेळी उपस्थित होते.
