Headlines

करिअर घडविण्याच्या दृष्टिकोनातून मर्चंन्ट नेव्हीचा मार्ग चोखाळावा…

कॅप्टन मकरंद सरदेसाई:वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे मोफत मर्चंट नेव्हीचे मार्गदर्शन..

⚡मालवण ता.१९-:
मर्चंट नेव्ही ही देशाची सुरक्षित अशी उद्योग संस्था असून मेहनत आणि अभ्यास केल्यास काही चुकीचे न करता आपल्याला बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मर्चंट नेव्हीचे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. नोकरीच्या वाटा शोधताना मुलामुलींनी करिअर घडविण्याच्या दृष्टिकोनातून मर्चंन्ट नेव्हीचा मार्ग चोखाळावा असे प्रतिपादन नवी मुबंई येथील रहेमान इन्स्टिट्यूटचे कॅप्टन मकरंद सरदेसाई यांनी येथे बोलताना केले

महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या पुढाकाराने मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रहेमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांच्या टीमने कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच डॉ दादासाहेब वराडकर महाविद्यालयाला भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या सचिव विजयश्री देसाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्नर कौन्सिल सदस्य श्री. विजय केनवडेकर, श्री. अश्विन देशमुख, श्री. प्रमोद म्हात्रे, कु. नियती पाटील पर्यवेक्षक श्री. महेश भाट आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी श्रीमती विजयश्री देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा श्री नामदेव मासे यांनी प्रास्तविक केले

यावेळी कॅप्टन मकरंद सरदेसाई यांनी मुलींनी आता गाव सोडून रोजगाराच्या नव्या संधी शोधल्या पाहिजेत कमी वयात चांगला पैसा मिळवून देणारी मर्चंट नेव्ही आहे कोरोना काळातील ज्या काही इंडस्ट्रीज सुरू होत्या त्यामध्ये मर्चंट नेव्हीचा समावेश होतो कोरोना काळात मर्चंट नेव्हीने चांगल्यापैकी काम केले असे सांगून त्यांनी मर्चंट नेव्ही म्हणजे काय यावर अतिशय महत्त्वाचं पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले तर विजय केंनवडेकर, . अश्विन देशमुख, श्री. प्रमोद म्हात्रे, कु. नियती पाटील यांनी मार्गदर्शन केले
शेवटी महेश भाट यांनी आभार मानले

यावेळी विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

You cannot copy content of this page