Headlines

स्नेह पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२१० बालकलाकारांचा सहभाग; २७ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण..

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील कलसुलकर हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी आणि पालकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत तब्बल २१० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन आपल्या कल्पनाशक्तीला कागदावर उतरवले. लहान वयातच मुलांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित पालक वर्गाने स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष आभार मानले. या स्तुत्य उपक्रमात रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांचाही सक्रिय सहभाग होता.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्नेह संचालिका सौ. वैभवी शेवडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. सिद्धार्थ भांबुरे, रो. सीताराम तेली, रो. आबा कशाळीकर, स्नेह पतसंस्थेच्या मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू, सौ. कोमल सावंत, श्री. रमेश निर्गुण, श्रीमती रईसा मुल्ला, मयुरी भगत, मानसी वेंगुर्लेकर, सौ. नेरुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, भटवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित स्नेह पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर व श्री. सोमनाथ जिनी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page