⚡मालवण ता.१८-:
मालवण स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये हिंदी विभागामार्फत हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए.ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, स्टाफ सेक्रेटरी प्रा.के.के राबते, प्रा. अन्वेषा कदम आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील मिसबाह काझी, ज्योती जाधव, जागृती पारकर, प्राजक्ता या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस भाषणे केली. प्रा.के. के. राबते यांनी भाषा माणसाच्या जीवनशैलीवर किती परिणाम करत असते याचे विवेचन केले. आयक्यूएसी प्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी विविध हिंदी कवितांचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. हंबीरराव चौगले यांनी मार्गदर्शन करताना हिंदी भाषेच्या विकासासाठी ज्या विविध साहित्यिकांनी प्रयत्न केले त्या साहित्यकारांच्या साहित्यकृतींचा उल्लेख केला. हिंदीबहुल प्रदेशांमध्ये हिंदी ही राजभाषा,संपर्क भाषा, साहित्यिक भाषा म्हणून वापरली जाते, हिंदी भाषा ही जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे असेही प्रा. चौगले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. ए. ठाकूर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगत बारा कोसावर भाषा व संस्कृती कशी बदलते हे समजावून दिले.
प्राध्यापक संकेत बेळेकर, प्रा. हसोटीकर, प्रा.रोहिणी फाटक आदींनी हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी गीतांजली चव्हाण हिने केले. याप्रसंगी कृत्तिका हडकर, आदिती आचरेकर, अंबाजी आदी विद्यार्थी उपस्थित होते.
