⚡मालवण ता.१७-:
राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम (आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन) २० सप्टेंबर रोजी सुनियोजितरित्या व यशस्वीरित्या करणेसाठी मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी तालुकास्तरावरुन ग्रा.पं. येथे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. सदर ग्रामपंचाय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित राहून
समुद्र स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी केले आहे. यात वायंगणीसाठी राजेंद्र रणसिंग, तोंडवळीसाठी सुधीर गायकवाड, रेवंडीसाठी सुरज बांगर, मिर्याबांदासाठी विनायक जाधव, कोळंबसाठी श्रीकृष्ण सावंत, वायरी भूतनाथसाठी सुनील चव्हाण, तारकर्लीसाठी उदय दिक्षीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
