श्वेता कोरगावकर: महिलांनी लाभ घेण्याचे केले आवाहन..
⚡बांदा ता.१६-: मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आणि विकास दिवसाच्या अवचित्य साधून, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित महिला रोजगार मार्गदर्शन मेळावा .
दिनांक 19 सप्टेंबर रोजी बांदा मंडलाचा आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे संध्याकाळी ठीक 3:30 वाजता आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात 23 सप्टेंबर रोजी सुदर्शन हॉल मळेवाड येथे संध्याकाळी 3:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे,
तसेच माजगाव जिल्हा परिषद मध्ये दिनांक 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 3:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे, इतरही सावंतवाडी विधानसभेमध्ये महिला मेळावे आयोजित करण्यात आले आहे, मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सदस्य, लघु सुष्म, मध्यम मंत्रालय श्री विजय प्रताप केनवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन महिलांना मिळणार आहेत , तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग, जिल्हा संयोजक श्री प्रसन्ना देसाई, बेसिकचे मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष आणि महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मार्गदर्शन सोहळा संपन्न होणार आहेतरी त्या त्या विभागातील महिलांनी, महिला बचत गट आणि इच्छुक महिलांनी या संधीचा फायदा करून घ्यावा आणि उद्योग धंद्यामध्ये आपली उन्नती साधावी असे आव्हान मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर सिंधुदुर्गाच्या वतीने करत असल्याचे केले स्पष्ट.
