रेकोबा हायस्कुलच्या मुला- मुलींचे खोखो स्पर्धेत सुयश…

⚡मालवण ता.१६-:
क्रीडा व युवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग , व मालवण क्रीडा समिती, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण येथे संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत रेकोबा हायस्कुलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.

१४ वर्षाखालील मुलांच्या संघांमध्ये कार्तिक रावले,हर्षल मोरजकर,मयूर चव्हाण, गौरंग मलांडकर, लक्ष्मण झोरे, जीत लुडबे, केदार मसुरकर, चैतन्य आळवे, विराट मेस्त तर १७ वर्षाखालील मुलींमध्ये श्रेया करंगुटकर, प्रज्ञा पवार,मानसी धुरत,स्वप्नाली भगत,सानिका झोरे,खुशी सावंत,योगिता जोशी, सनिशा देऊलकर,जिया शिरोडकर,निधी म्हापणकर,वैष्णवी तोंडवळकर, रिधीमा परकर हे विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते.

या दोन्ही संघाना क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री. खोचरे, पालक शिक्षक संघ पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page