नरेंद्र मोदी यांच्या मातेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने आज बांदा भाजप महिला मंडळ यांच्या वतीने निषेध आंदोलन …!

⚡बांदा ता.१५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेबाबत आक्षेपार्ह विधान आणि अपमानास्पद चित्रण केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी इन्सुली खामदेव नाका येथे भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चा आणि बांदा मंडळ यांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पंतप्रधान हे देशाचे प्रमुख आहेत. त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरणे तसेच वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा केवळ त्यांचा नव्हे तर संपूर्ण मातृशक्तीचा अपमान आहे. मातृशक्तीचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही.” ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ या भारतीय संस्कृतीतील भावनेचा अपमान करून काँग्रेसने समाजात विष पेरण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या जाहीर निषेध आंदोलनात भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ महिला अध्यक्ष सौ. रूपाली शिरसाट, राखी कळंगुटकर, मानसी धुरी, शर्वणी गावकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, जिल्हा चिटणीस महेश धुरी, मधुकर देसाई, सचिन बिर्जे, नारायण कांबळी, गुरु कल्याणकर, उमेश पेडणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
इन्सुली येथे निषेध करताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

You cannot copy content of this page