नवीन कुर्ली ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन नवीन कुर्ली येथील अनंत दळवी, सुभाष दळवी, सुरेंद्र पवार, वासुदेव परब व धोंडू चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे आणि कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी रावराणे व तळेकर यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सतत होत असलेल्या प्रवेशामुळे नवीन कुर्ली गावातील भाजपाची ताकद अधिक वाढली असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. या कार्यक्रमास अलंकार रावराणे, राजेंद्र कोलते, अमित दळवी यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page